Nobel Science Talent Search Exam (NSTS)

“Science is a beautiful gift to humanity,

We should not distort it.”

Registration Now

Mission

  • TO Develope scientific generations for betterment of Indian society.
  • To Guide Students about science, technology for developement of Indian education.
  • To enhance science activity, experimental knowledge and science friendly atmosphere.
  • Helping poor students to complete their education. in sciences.
  • Innovate to deliver word class education to rural students Create benchmark to become a leader with efficient education system.
  • Empower students, Teachers, parents for enrichment of kids and creative generations.

Vission

TO be the most reliable, Authentic institution for students and youths through educational Services. To be a responsible for enrichment of endian youths..

Values

Excellence – we will passionate about achieving highest standards of quality in education and Youth developement.

Integrity- We will be fair, honest, transparent. and ethical in our work &

Responsibility – We will integrate environmental & social principles in our system.

Role models ODT APJ Abdul Kalam.

@ Mahatma Gandhi

Online Courses

Jaydeep patil

Co-founder Of Nobel 

( M.Sc chem, MA MCJ )

जर प्रत्येक विद्यार्थी विज्ञाननिष्ठ आणि संशोधना-प्रति बांधिलकी असणारा घडत असेल तर भारताला विश्वगुरू होण्यापासून कुणीही थांबवू शकत नाही, म्हणूनच नोबेल फाउंडेशन विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात कार्य करीत आहे. समाजातील सर्वात महत्त्वाचे घटक म्हणजे पालक, विद्यार्थी आणि शिक्षक आहेत. या तिघांनी ठरवले तर शिक्षण क्षेत्रात अमुलाग्र बदल घडतील. नोबेल फाउंडेशन या तीनही घटकांच्या सेवेसाठी हातात विवेकाची मशाल घेऊन कार्य पथावर आहे. जळगाव सारख्या ग्रामीण जिल्ह्यातून ही चळवळ सुरू झालेली आहे या चळवळीला आता व्यापक करूया.

– Jaydeep Patil

Directors Desk

सस्नेह नमस्कार,
                    नोबेल फाउंडेशन गेल्या सात वर्षांपासून विज्ञान तंत्रज्ञान क्षेत्रात तसेच शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत आहे. ग्रामीण भागातील तसेच शहरी भागातील विद्यार्थी, शिक्षक व पालक यांना विज्ञानाबाबत आणि संशोधनाबाबत आवड निर्माण व्हावी यासाठी आम्ही सर्व तरुण कार्य करीत आहोत. जगाच्या वेगाने जर भारताला प्रगती करायची असेल तर भारतातील प्रत्येक पिढी ही विज्ञान प्रेमी असावी लागेल. युरोपीयन तसेच अमेरिकन देशांनी विज्ञानावर अमाप संशोधन केले त्या आधारावर प्रगती करण्यासाठी अद्ययावत तंत्रज्ञान निर्माण केले. आणि ती राष्ट्र आता महासत्ता म्हणून ओळखली जातात. भारताचे माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ एपीजे अब्दुल कलाम यांनी एक स्वप्न पाहिले होते की 2020 मध्ये भारत महासत्ता बनेल, परंतु ते स्वप्न आपण पूर्ण करू शकलो नाहीत. याचे कारण म्हणजे आपल्याकडील विज्ञानाबद्दल आणि तंत्रज्ञानाबद्दल असणारी अनास्था होय. आजही आपला समाज अनिष्ट चालीरीती, अंधश्रद्धा, परंपरा या गोष्टींमध्ये अडकलेला आहे. या सर्वातून बाहेर पडूनच आपल्याला विज्ञान वादी विश्वगुरू भारत निर्माण करता येईल.
               विद्यार्थ्यांमध्ये अवकाश तंत्रज्ञानाबद्दल गोडी निर्माण व्हावी भारतीय समाजातून डॉ.एपीजे कलाम सर, रॉकेट शास्त्राचे जनक रॉबर्ट गोडार्ड ,इलॉन मस्क ,रिचर्ड ब्रॅन्सन यांच्यासारखे विज्ञान प्रेमी विद्यार्थी घडावेत यासाठी नोबेल सायन्स टॅलेंट सर्च परीक्षा एक अनमोल संधी विद्यार्थ्यांसाठी बनलेली आहे. या माध्यमातून खेड्यापाड्यातील तसेच शहरी भागातील विद्यार्थ्यांना भारतीय अवकाश संशोधन संस्था (इस्रो)ला भेट देऊन अवकाश क्षेत्राबद्दल जाणून घेण्याची अमूल्य संधी उपलब्ध होते. इस्रोच्या अत्यंत प्रेरक वातावरणातून विद्यार्थी उत्तुंग करिअरची प्रेरणा घेतात. शालेय वयातच इसरो आयआयती, आयआयएम सारख्या उच्च शिक्षण संस्था अनुभवता आल्या तर विद्यार्थ्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडून येतो म्हणूनच गेल्या चार वर्षांपासून या परीक्षेसाठी नोबेल फाउंडेशन अहोरात्र काम करत आहे.

             शाळा, शिक्षक, विद्यार्थी, पालक सर्वच गटांमध्ये विविध उपक्रमांच्या माध्यमातून विज्ञानाबाबत आवड निर्माण करण्यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत. या प्रयत्नांना आपल्यासारख्या प्रत्येक व्यक्तीचे आशीर्वाद आणि सहकार्य अपेक्षित आहे. आपण सर्व मिळून कलाम सरांचे स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न करूया आणि भारताला महासत्ता बनवू या.
शुभेच्छा !

जयदीप पाटील
संस्थापक, नोबेल फाउंडेशन, जळगाव